You are currently viewing जखम, तनाची आणि मनाची…

जखम, तनाची आणि मनाची…

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*वक्रतुंड साहित्य समूह संस्थापक लेखक कवी जगन्नाथ खराटे लिखित अप्रतिम लेख*

*अध्यात्माच्या प्रांगणात..*

*जखम, तनाची आणि मनाची…*

जुनेजाणते लोकं सांगत की मानसाने नेहमीं पुढे पाहून चालावे.म्हणजे ठेंच लागनार नाही….पन् सहसा मानुस पुढे पाहूनंच चालत असतो.त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय असेल ?असा विचार करीत रस्त्याने पुढे चालत असताना,पन् पुढे रस्त्यात अचानक खड्डा आला. तोल सावरला तरी पाय अडखळत ठेच लागलीच.पायाच्या बोटातुन रक्त वाहू लागले..
अन् ऊलटपाऊली घरी गेलो व मलमपट्टी औषधोपचार केले.अन काही दिवसांत जखम भरलीसुद्धा…
पन्, मनात राहुन राहुन वाटे की, जुणीजाणती मानसं सांगत असतात पुढे पाहुन चालावं ह्या गोष्टीचा,त्याचा खोलवर विचार करून ,आपल्यांच तंद्रित चालतं गेल्यामुळेंच हे घडलं असेल. कारण जुणीजानती मानसं हे कधीच चुकीचे सांगणार नाही……

आपल्या शरिरावर जखम, होण्यासाठी कधीकधी आपलीच चूक कारणीभूत ठरते.तर कधीं कधीं ती इतरांच्या चुकीमुळे होत असते.. अन् ती औषधोपचारानं काही काळानं भरुन जाते.आपंन कितीही सांभाळून चाललं तरी शेवटी अचानक अपघात होवुन जखम होतेंच.पन्,आपण ती चुक इतरांवर लादत असतो.तर काहीजन, समंजसपणा दाखवून हे सारं काही आपल्या नशिबावर सोडून देतात … शरिराची जखम काही काळानंतर भरते,तसंतसं आपण सावधपने वागुन शहाने होत असतो,,नंतर आपन शरिरावर, आघांत किंवा जखम होवु नये ह्यासाठी सदैव जागरुक असतो..

मानवी शरीराची आपण काळजी घेत असतो.. शरिराच्या आंत मनही राहते. अन् मनावर जखम होऊ नये म्हणून किती लोक काळजी घेतात हा एक प्रश्नंच आहे,मनाच्या जखमेची काळजी घ्यायला पाहिजे. अन् जशी शरिराला जखम होते, आघात होतांत तशीच, मनावरही जखम होते…कारण शरिर अन् मनाचा किंबहुना मनाचा अन् शरिराचा हा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे किंवा दोन्ही शिवाय मनुष्य जगुंच शकंत नाही. शरीरावर आघांत केल्याने जखमा होतात. अन् त्या जाणून बुजून किंवा चुकुन किंवा अपघाताने होतात ‌‌अगदि तसंच मनाच्या बाबतीतही आहे..

मन,,मन म्हणजे अनेक विचार किंवा अनेक भावनांचा,अथांग सागर.. मनाच्या सागरांत अगदी क्षणाक्षणाला असंख्य भावना अथवा विचारांचे आदानप्रदान होत असते ..अगदी समुद्रात उठनारया अनंत तरंगासारखे मनातही अनेक विचार येतात अन् जातात.. त्यातील काही विचार शरिराला कार्य करायला भाग पाडतात.अन त्यामुळे कार्य घडते.. बोलनं,चालनं,हाताने अनेक प्रकारची काम करनं इत्यादी,पन्, काही कार्य ही अनाहुतपने सतत घडतंच असतात.. त्यावर मनाचं नियंत्रण नसतं. काही अवयव हे मनाशिवाय कार्य करतात.. त्यामध्ये श्वासोच्छ्वास, जांभई, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप, अन्नपचन, हृदयाची सदैव होणारी हालचाल, ही सारं कामं आपोआपंच होतं असतात….

मुख्य विषय म्हणजे, मनावर जखम कशी होते.. किंवा आघांत कसा होतो.. आपन वर पाहिल्याप्रमाणे मन म्हणजे असंख्य विचार…, अन् ते विचार हे सुखदायी तसेच दुःखदायी असु शकतात..विचार..अन् हे विचार आपले असतात त्यामुळे ते जास्त घातक नसतात असं आपल्याला वाटतं…पन् असं नसतं.. नकारात्मक विचार हे आपल्याला घातक ठरु शकतात. अन् त्यामुळे मन दुबळं होतं, कमकुवत होतं. ह्यामध्ये भविष्याची विनाकारण अवास्तव चिंता, भिंती, खेद, दडपन ह्यामुळे मनावर आघांत होवून दुबंळ होतं.म्हनजेंच एकार्थाने मन जखमी होत. त्यांचप्रमाणे इतरांच्या नकारात्मक विचाराने किंवा कटु शब्द, कटु वागणुक अथवा कुविचाराने, वाईटभावनेने, आपल्या विचारांवर किंवा मनावर,आघांत होतो,अन् आपले विचार हे निष्क्रिय होतात.. किंवा हतबल होउन जातात ह्यालांच मनावर झालेली जखम म्हटले जाते.. इतरांच्या विचारांचा मनावर झालेल्या आघाताने आपलं मन दुखावतं..जखमी होतं..हे कसं घडतं.. खरं तर,पन् हा आघात होण्यासाठी इतरांच्या बोलण्यामुळे वागण्यामुळे हे सारं घडतं.पण ते आपल्याला अशा प्रकारे का दुखावतांत ?हाही एक प्रश्नच आहे.. ह्यामध्ये नातेवाईक, भाऊबंद अथवा समाजातील काही व्यक्तींच्या कटु बोलण्यातुन कटु किंवा अपमाना स्पद वागणूक ह्यांचा समावेश असतो…
अन्, ह्यासाठींच पुर्विचे लोक म्हणायचे की पुढे पाहून चालायचे……
ह्यांचा खरा अर्थ हा निघतो की, आपण जर इतरांच्या मनाचा विचार करुन चांगले वागलो तर,लोकही आपल्याशी चांगले वागतील. आपन दुसर्यांना दुखावलं नाही तर तोही आपल्याला दुखावणार नाही.. खरंतर…आपन जे देवु तेंच आपल्याकडे परत येते हा निसर्गाचा नियम आहे. चांगल्याला चांगलं फळ तर वाईटाला वाईट फळ मिळेलंच हा सृष्टीचा अलिखित अटळ असानियम आहे..

तर मग प्रश्न असा येतो की, आपन चांगलं वागुनही काही लोक आपल्याशी वाईट का वागतात??. उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या संस्कारी घरात एखादं अपत्य असं जन्माला येतं की ,जे आईबाबांच्या नावाला काळीमा फासतं.आईबाबांच्या चांगल्या वागणुकीचं हे असं वाईट फळ का मिळतं?इथं निसर्गाचा नियम उलटा दिसुन येता का?…..
पन् इथंच खरी गम्मत आहे.. निसर्गाचा नियम हा नेहमीच सरळसोट असतो. “जशास तसे”ह्या निसर्गाच्या नियमा नुसार चांगल्याचं चांगलं फळ.व‌ वाईटाला वाईट फळं मिळत.. पन् हे फळ कधी मिळणार हे नक्की नसतं.. ते ताबडतोब मिळतं नाही हे मात्र नक्की ‌.. अनेक जन्माची कर्माचे फळ हे भोगण्याशिवाय गत्यंतर नसते.. अन्,मानुस जन्माला आल्यावर, मागील जन्माची परतफेड किंवा देणीघेणी बाकी असेल तर ती कर्ज वसुली करण्यासाठी मागील जन्मातली व्यक्ती आपल्या पोटी जन्माला येतात किंवा नातेवाईक अथवा इतर रुपाने आपल्याला अन् शारीरिक , मानसिक , किंबहुना भावनीक रुपाने त्रास देऊन मनावर आघांत करित असतात. कर्ज वसुली करीत असतात.अन ह्या जखमा आयुष्यभर उराशी बाळगून हे जगावं लागतं,

मग ह्या वर काही उपाय आहे का??
हो नक्कीच आहे.. अगदी कसलीही कुरकुर न करता गतजन्माचे फळ भोगणे..अन् सद्ध्याच्या जिवनात सदैव चांगलंच वागणे.. जशास तसे वागणे हा नियतीचा नियम आहे.. मनुष्याला तो अभिप्रेत नाही..दुसर्यांने आपल्याला दुखावले तर त्याला आपन दुखावने हे मनुष्याला शोभत नाही.. किंबहुना निरपराधांना शासन करुन त्यांचा जगण्याचा हक्क हिरावुन घेणे हा मनुष्य धर्म नाही..अन् अशा वागण्याने त्या मनुष्याला अश्वत्थाम्यासारखं चिरंजीव दुःखाची भळभळती जखम घेवून जगण्याशिवाय अन्य मार्गच उरत नाही..

,श्री-जगन्नाथ खराटे-ठाणे
१५डिसे,२०२२
.

प्रतिक्रिया व्यक्त करा