*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कारभारी* 🌹
तुम्ही माझं धनी
मी तुमचीचं रानी
चला जाऊ माळरानी
पाहू पाटाचं पाणी
पाणी खळखळ जातं
गाऊ त्याच्या संग गाणी
झाडावर साथ देते
गोड माझी मैना रानी
बसू आंब्याखाली थेट
खाऊ झुणका भाकरी
कांदा हातानं फोडतो
असा माझा कारभारी
झाडावरचा पाखरुं
डोळ लुक लुक करतं
गोष्टी तुमच्या नि माझ्या
कान देऊन ऐकतं
हिरव्या गार बांधावरी
बसु थोडं गुमशान
सोनं पिकलं समदं
पाहु सुखाचं सपानं
हिरवगार झालं रान
कशी नजर पुरना
माझ्या धन्याच्या कष्टाची
सर कशाला येईना
बारे दया वा शेतामध्ये
अवघ शिवार आपलं
करु समदी चाकरी
पिक मोतीयाचं आलं
रुबाबदार मिशीचा
गाडीवान दौलतीचा
धनी माझा बाजीराव
कारभारी आयुष्याचा
*शीला पाटील. चांदवड.*