सावंतवाडी:
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सव्विसावा कार्यक्रम रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विद्या विहार हायस्कूल,आजगावच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचा विषय ‘दशावतार नाटकांची संहिता’ हा असून तो मांडणार आहेत सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक आत्माराम बागलकर सर. बागलकर सर, हे मूळ तेंडोली( बागलाची राई ) इथले. ते सरस्वती माध्यमिक विद्यालय, आरवली-टाक येथून सेवानिवृत्त झाले. अलिकडेच त्यांचे ‘आनंदाचे डोही’ हे आत्मकथन प्रकाशित झाले आहे. ‘दशावतारी नाटके’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून त्यांनी अश्या नाटकांच्या अनेक संहिता लिहिल्या आहेत. ‘केशवसृष्टी’मुंबई येथे त्यानी हिंदीतून दशावतारी नाटक सादर केलेय.
तरी त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि चर्चा करणेसाठी या कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.