*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उगाच रेंगाळू नका !*
जवळच्याचेचं बंधन होईल
इतकं कुणाच्या जवळ जावू नका
कुणाला आपली गरज नसेल तर
तिथे!उगाच रेंगाळू नका
कंटाळा येईल इतका
कुणाशी जवळीक इतकी साधू नका
नशिबाने जोडलेली नाती जपावी
स्वतःहून कोणाला तोडू नका
जवळ राहूनही परकी वाटतात
ती ही आपलीच माणसं
दूर राहूनही जवळची वाटतात
ती ही आपलीच माणस
संधी देतात!संधी साधतात
पाठीशी असतात!पाठ दाखवतात
ती ही असतात!आपलीच माणसं
पाठ फिरताच!पाठ फिरवतात
चांगूलपणाचे ओझे वाटेल
इतकं चांगल वागू नका
तुमचं गोड बोलणं!चांगल वागणं
कुणास अवघड वाटू देवू नका
शेवटी!नकोस होईल इतकं जगू नका
हवेसे वाटतो!तेव्हाच पटकन दूर व्हा
जीवनाच्या वाटेवर!आपल नाव ओठी
राहाव!इतकच करून जा!दूर व्हा!
उगाच रेंगाळू नका….
दुस-यालाही उगाच थांबवू नका…!!!
बाबा ठाकूर