You are currently viewing मुक्ताई अकॅडमीच्या कु. साक्षी रामदुरकर हिचा जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक

मुक्ताई अकॅडमीच्या कु. साक्षी रामदुरकर हिचा जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक

सावंतवाडी :

सावंतवाडीतील मुक्ताई अकॅडमीची कु. साक्षी रामदुरकर हिने माणगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. साक्षीने सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करून १४ वर्षाखालील गटात जिल्ह्यात आपले वर्चस्व ठेवले. मागील २५ वर्षे अनेक राज्य आणि राज्यस्तरीय कॅरम खेळाडू तयार करणारे जिल्ह्यातील जेष्ठ राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष श्री. कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने हे उल्लेखनीय यश मिळवले आहे.

राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांनी कु. साक्षीचे कौतुक करतानाच कै. सूर्यकांत पेडणेकर यांच्या कार्याची दखल घेतली. सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे सर्वेसर्वा संस्थापक कै. सूर्यकांत पेडणेकर यांनी गेली तीस वर्षे जिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कार्यामुळे आज जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर प्रगती करत आहेत. त्यांच्या मागून त्यांची चिरंजीव व मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष श्री कौस्तुभ पेडणेकर यांनी देखील हे कार्य पुढे सुरू ठेवण्याचे सांगत राणीसाहेबांनी त्यांचे कौतुक केले. मागील ८ वर्षात मुक्ताई अकॅडमीच्या माध्यमातून पहिल्यांदा जिल्ह्यातील २ मुली राष्ट्रीय स्तरावर आणि ९ मुले व मुली राज्यस्तरावर खेळले आहेत.

राणीसाहेब शुभदा देवी भोसले यांनी कु. साक्षीला पुढे होणाऱ्या विभाग स्तरावरील स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यासमवेत क्रीडा शिक्षक श्री. नारायण केसरकर, श्री. कौस्तुभ पेडणेकर, साक्षीचे आई-वडील व खेळाडू उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा