You are currently viewing पुन्हा भरली शाळा ! माजी विद्यार्थ्यांची !

पुन्हा भरली शाळा ! माजी विद्यार्थ्यांची !

*पुन्हा भरली शाळा ! माजी विद्यार्थ्यांची !!*

*समाजप्रबोधन शिक्षण संस्था मुंबई संचालित , डॉ.र.दि.गार्डी माध्यमिक विद्यालय कळंबस्ते वाडावेसराड यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा.*

जुळले बंध विणले नाते
प्रेम फुलांनी सजले अंगण
पुन्हा भेटण्या येती पाखरे
गुफण्या मैत्रीचे बंधनं

समाज प्रबोधन शिक्षण संस्था मुंबई संचालित , डॉ. र. दि.गार्डी माध्यमिक विद्यालय कळंबस्ते वाडावेसराड यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा दिनांक १० डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने आणि उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला ६०० विद्यार्थ्यांनी उपस्थिति दर्शवली होती.मेळाव्यामध्ये सन १९८८ ते २०२२ या पर्यंतच्या बॅच ची मुले/मुली उपस्थित होते. त्यामुळे हा मेळावा रमणीय आणि श्रवणीय झाला.या मेळाव्याला या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री वि. ल.मोहिते साहेब आणि सर्व संस्था पदाधिकारी उपस्थित होते.त्याच प्रमाणे या शाळेचे माजी आणि आजी शिक्षक वृंद देखील उपस्थित होते. यामध्ये श्री.अजित जाधव सर, श्री. सौदालगे सर, श्री.तांबे सर, सौ.प्रियांका दळी मॅडम सोबत माजी शिक्षक वर्ग श्री.साबणे सर, श्री. दिंडे सर,श्री.तुराई सर, सौ.गावडे मॅडम, सौ.बिर्जे मॅडम इ. त्याच प्रमाणे १९९१ बॅच चा पाहिला विद्यार्थी जो दहावीला पाहिला उत्तीर्ण झाला होता तो माजी विद्यार्थी संतोष विष्णू बाईत याने मेळाव्यामध्ये सर्व माजी विद्यार्थी म्हणून प्रतिनिधित्व केले.
मेळाव्याचे संपूर्ण नियोजन आयोजन हे सर्व या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. प्रमोद दळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर आणि शिस्तबध्द पध्दतीने पार पडले. महापुरुषांना पुष्पांजली अर्पण करून दीपप्रज्लनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. जशी शाळेची सुरूवात घंटा नाद करून होते अगदी तसाच भरला मेळावा तो ही या शाळेचे शिपाई बाबू दादा मोहिते यांनी घंटा नाद करून मेळाव्याला सुरूवात झाली . या शाळेचे आजी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि ईशस्तवन गाऊन सर्वांचे मन मोहून घेतले. मेळाव्याच्या पहिल्या पर्वात माजी विद्यार्थी अजित बाईत आणि अल्पेश सोलकर या दोघांनी निवेदन करुन पाहुण्याचे स्वागत /सत्कार समारंभ पार पाडला.शिक्षक वृंद आणि शिक्षण संस्था पदाधिकारी यांचे मनोगत व्यक्त करत पाहिले पर्व संपन्न झाले.
दुपारी मध्यांतरनंतर मेळाव्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात झाली.या पर्वाचे निवेदन माजी विद्यार्थी राकेश डाफळे यांनी केले. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काही आजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये रांगोळी स्पर्धेने या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली होती. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण हे माजी विद्यार्थी कला शिक्षक श्री.प्रथमेश विचारे यांनी केले. या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला आणि आणि त्या नंतर चालू झाले ते विद्यार्थी मनोगत आणि अनुभव कथन..आज इथे न बोलणारा विद्यार्थी जो कधी शाळेच्या मागच्या बाकावर बसत होता किंवा कधीही स्टेज देरींग न करणारा विद्यार्थी व्यक्त होऊ लागला होता. पुन्हा जुन्या गोष्टीना उजाळा देत. शाळेत जगलेले क्षण आपल्या भाषणातून आठवणीतून पुन्हा जिवंत होताना पाहायला मिळत होते. कोणी किती मार खाल्ला कोणी किती मस्ती केली .किंव्हा मला शिक्षण किती महत्वाचे आहे .याची नोंद त्यांच्या मनोगतात स्पष्ट होत होती. कोणी पाणावलेल्या डोळ्यांनी हृदयातील भाव व्यक्त करत होते तर कोणी खडतर भाषेत नवी उमेदीने जगण्याचे भाष्य करत होते. खरोखर

शाळा घडवते जिवंत मानस
शिक्षण देते विश्वास नवा
उंच रवाने सांगू जगाला
आजीवन शिक्षणाचा ध्यास हवा.l l

या मनोगत आणि अनुभव कथन पर्वाचे निवेदन हे माजी विद्यार्थी सतीश चव्हाण यांनी केले.अश्या प्रकारे मेळाव्याचे दुसरे पर्व संपन्न झाले.
सायंकाळी ७ वाजता सुरूवात झाली मेळाव्याच्या तिसऱ्या पर्वाला आणि या पर्वाचे निवेदन केले माजी विद्यार्थी सुहास बाईत यांनी. ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो कार्यक्रम म्हणजे ” डान्स आणि कॉमेडीची अचूक टायमिंग आणि आजी माजी विद्यार्थी मिळून सुरू झाले गॅदरिंग अर्थातच सांस्कृतिक आणि विविध गुण दर्शन कार्यक्रम खरोखरच अप्रतिम अशी कला प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यानी दाखवली.कॉमेडी स्किट/लावणी नृत्य/गोंधळ/जोगवा/वेस्टर्न डान्स/कोळी डान्स/वारकरी दिंडी/वासुदेवाची स्वारी/संगमेश्र्वरी नमन/अबुराव बाबुराव यांची विनोदी धमाल अश्या विविध प्रकारच्या कलाकृती सादर केली गेली. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम दुमकदर आणि धडाक्यात झाले…पण या मेळाव्याच्या सांस्कृतिक विविध गुण दर्शन कार्यक्रमांमध्ये एक एतिहासिक कलाकृती ठरली खास मेळाव्याचे आकर्षण ” श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची मावळ्यांची सोबतची स्वारी ठरली विलोभनीय आणि प्रेक्षणीय. अंगाला शहारे उमटवणारी अशी ही कलाकृती संगमेश्वर मध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळाली. आणि ही कलाकृती सादर केली ती या शाळेचा माजी विद्यार्थी सागर नांदलजकर आणि त्यांचे विद्यार्थी मित्र परिवार.

शेवटी माजी विद्यार्थी अजित बाईत यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे ,संस्था पदाधिकारी,शिक्षक वृंद, देणगीदार आणि प्रेक्षक वर्ग यांचे आभार मानले सोबत मेळावा नियोजन टीमचे एकजुटीने केलेल्या कामाला शुभेच्या देत या भव्य दिव्य मेळावा संपन्न झाला असे बोलून सांगता केली.

माजी विद्यार्थी
सुहास सोनू बाईत.
उमरे ( बाईत वाडी)
संगमेश्वर/ रत्नागिरी.

प्रतिक्रिया व्यक्त करा