You are currently viewing महाराष्ट्र व कर्नाटक सीमावाद हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहे का?

महाराष्ट्र व कर्नाटक सीमावाद हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहे का?

मसामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांचा सवाल.

आपल्या जीवाची परवा न करता देशाच्या सीमेवर राहून देशाला संरक्षण देणारे आपल्या देशाचे सैनिक हे वेगवेगळ्या राज्यातील तसेच विविध जाती धर्मातील असतात.
स्वतःच्या जीवाची परवा न करता शत्रूशी लढता लढता बलिदानाला ही सामोरे जातात त्यांच्या बलिदानाने त्यांच्या कुटुंबावर केवढा मोठा आघात होत असेल याची कल्पना आपण करू शकतात का ?
आजच्या विचित्र व घाणेरड्या राजकारणामध्ये वाहत गेलेली युवा पिढी व मध्यमवर्गीय कुटुंबातील युवक यांनी कधी असा विचार केला का, की हे सर्व राजकीय मंडळी पडद्यामागचे कलाकार असतात व तुम्हा आम्हाला पुढे करून अशा प्रकारचे सीमावाद, प्रांतवाद, भाषावाद, धर्मवाद, जातिवाद या गोष्टीला खत पाणी घालून तुम्हा आम्हाला पेटवतात आणि आपण आराम खुर्चीवर बसून टीव्ही पाहत असतात.
देशाच्या नागरिकांनी जरा विचार करावा आपल्या अशा वागण्यामुळे सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या मनावर काय परिणाम होत असणार.
आपण कोणाशी आणि कशासाठी लढतोय भांडतोय यातून काय निष्पन्न होणार आहे त्या राजकीय मंडळीने हे न सुटण्यासाठीच हे प्रश्न या नेत्यांनी राजकारणासाठी ठेवले आहेत हे कटू सत्य आहे मित्रांनो याच जरा भान ठेवा.
26 /11 चा जो मुंबईमधील ताज हॉटेल वर परकीयांनी हल्ला केला त्या वेळी देशातील व विविध राज्यातील सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबईवरील संकट दूर केल.
जर त्यावेळी त्या सैनिकांनी असा विचार केला असता की हे माझ्या राज्यातील संकट नाही मी का लढू, माझ्या जीवाचे बलिदान का देऊ अशा त्यांच्या विचाराने महाराष्ट्र व मुंबईचे काय झाले असते. अजूनही वेळ गेला नाही जागे व्हा.
विविध पक्षातील नेते मंडळी तुमची आमची माती भडकवत असतात त्यापेक्षा ह्या मंडळींनी सीमेवर जाऊन लढून देशाचे संरक्षण करावे अन्यथा देशाच्या मूलभूत गरजा शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे कारण आत्ताच कुठेतरी कोरोनाच्या महामारीतून हि हताश जनता सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.
✊ *जय भारत* ✊
*राजू मसुरकर*
*अध्यक्ष*
*जीवन रक्षा वैद्यकीय* *प्रतिष्ठान सावंतवाडी*

प्रतिक्रिया व्यक्त करा