You are currently viewing सावंतवाडी एसटी आगार परिसरात अस्वच्छता..

सावंतवाडी एसटी आगार परिसरात अस्वच्छता..

मनसे शिष्टमंडळाचा आगार अधिकाऱ्यांना घेराव; मंगळवार पर्यंत स्वच्छ्ता करण्याचे आश्वासन

सावंतवाडी

येथील एसटी आगाराला स्वच्छता न ठेवण्यासंदर्भात आज मनसेच्या वतीने घेराव घालण्यात आला. सावंतवाडी आगार परिसतील शौचालयची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य झालेले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.तेथील शौचालयला जाण्यासाठी कंत्राटदार कडून रक्कम आकरण्यात आली. तरीही नागरिकांना त्रास सहन का करावा लागतो.? असा सवाल उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यानी केला.

दरम्यान मनसेचे पदाधिकारीनी स्थानक प्रमुख श्री. पवार, श्री. मोहिते यांना घेऊन निरीक्षण केले आणि दुर्गंधीचे साम्राज्य निदर्शनास आणून दिले.तेव्हा उपस्थित पदाधिकारी यांना मंगळवार पर्यंत स्वच्छता करण्याचे आश्वासन दिले.

सावंतवाडी आगार येथील स्वच्छतेवर आश्वासननुसार मंगळवारपर्यंत उपाययोजना करावी अन्यथा मनसे पदाधिकारी यांच्या रोषास सर्वस्वी जबाबदार तेथील अधिकारी आणि कंत्राटदार राहतील असे उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

यावेळी माजी उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, कौस्तुभ नाईक, प्रवीण गवस, मनोज कांबळी, दर्शन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा