*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा.नंदू वानखडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ही कुणाची माय..?*
जिने सारी जिंदगानी घातली श्रमात रे
ही कुणाची माय आज वृद्धाश्रमात रे..
हा कोण शहाणा इतका शाळा शिकला
जिवंतपणीच आपल्या मायला मुकला..
लेक तिचा आहे कुण्या कार्यक्रमात रे…
कोण बहाद्दर हा असा, येडा की पिसा
माय ठेवून इथे, तिथे भरतो खिसा
जगतोय असा कुण्या भ्रमात रे….
जन्म दिला तिने तिचा काय फायदा ?
कडक झाला पाहिजे अधिक कायदा ?
असू द्या ना कुणी कुण्या धर्मात रे…
— नंदू वानखडे, मुंगळा
9423650468