*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*राम नाम …*
राम नाम राम नाम हेच सार सर्व धनं
अंती आसरा हो तोच सांगा विचारतो कोण ?
राम नाम राम नाम …….
साऱ्या नामाचे हे सार पावन ते घरदार
राम येताच मुखात खुले स्वर्गाचे ते द्वार
रामनाम रामनाम तोच श्वास तोच प्राण..
राम नाम राम नाम ….
रामनामाचा महिमा जाणे हनुमान खूप
हृदयात स्थापियले रामरायाचे ते रूप
भक्ती असावी अशीच ठेवी जीवाला गहाण
राम नाम राम नाम ….
रामनाम हे तारक सर्व सुखाचे कारक
भार वाहतो भक्ताचा आहे दु:ख निवारक
राम असू द्यावा मुखी सुखावती पंचप्राण
राम नाम राम नाम ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: १०/१२/२०२२
वेळ: रात्री: ९/५