स्वस्थ मनासाठी स्वस्थ शरीर आणि स्वस्थ शरिरासाठी व्यायाम, खेळ महत्वाचा
– पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल
सिंधुदुर्गनगरी
स्वस्थ मनासाठी स्वस्थ शरीर आणि स्वस्थ शरिरासाठी व्यायाम, खेळ महत्वाचा आहे. त्यासाठी शालेय स्तरापासूनच आयोजित होणाऱ्या क्रीडा महोत्सवांचे फार मोठे महत्व आहे. अशा क्रीडा प्रकारात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे,असा संदेश पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिला.
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचा पारितोषिक वितरण व समारोप आज झाला. या प्रसंगी कोकण विभागाचे महिला व बाल विकास विभागीय उपायुक्त बापूराव भवाने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधिश डी. बी. म्हालटकर, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा परिषदेचे कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, बाल न्याय मंडळाचे सदस्य कृतिका कुबल, सुनील खोत, सुनिता धिंदळे आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक श्री. अग्रवाल म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानामुळे जीवन सहज व सोपे झाले आहे. पण, युवा पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा जपून वापर केला पाहिजे. नागरिकांनीही जागरुक राहिले पाहिजे. नेहमी मदतीसाठी पुढे आले पाहिजे. अप्रिय घटना घडत असल्यास पोलीसांचीशी तातडीने संपर्क साधला पाहिजे. पोलीस विभाग आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात आणि सदैव दक्ष असतात.
‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीद आहे. पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत. पोलीस रक्षणासाठी असल्याने त्यांची भीती बाळगू नये,असेही ते म्हणाले.
विभागीय उपायुक्त श्री. भवाने म्हणाले, मोठ्यांनी लहानांना समजून घेणे काळाची गरज आहे. मुलांनाही अडचणी असतात हे जर मोठ्यांनी स्वीकारले तर लहानांच्या अनेक अडचणी टळतात. बालके, महिला यांच्यावर अत्याचार होत असतांना बघ्याची भूमिका घेऊ नये. पीडित व्यक्तीच्या पाठीशी कायम ठामपणे उभे रहा. लहान हे चुकतात म्हणूनच ती शिकतात. त्यांना समजून घेऊन मोठे होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करा.
न्यायाधिश श्री. म्हालटकर म्हणाले राज्यघटनेमध्ये 14 वर्षाखालील मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे केले आहे. कोरोना काळात शाळा बंद राहिल्यामुळे ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. यामुळे मुलांमध्ये मोबाईल वापराचे प्रमाण वाढीस लागले. अती मोबाईल वापरामुळे सायबर गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ झाली. हे कमी करण्यासाठी त्यावर आता नियंत्रण आणून मोबाईल वापराचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे.
कार्यक्रम अधिकारी श्री. भोसले यांनी, प्रत्येक बालकांनी चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्न करावा. आयुष्य आंनदात जगावे, असा संदेश त्यांनी गुरु व शिष्याची गोष्ट सांगून दिला.
देशाचे खरी ऊर्जा व भविष्यही मुलेच आहेत. पण काही मुलांचे पालकत्व हिरावले जाते अशाचा सांभाळ शासन करते. शासकीय मुलांचे निरिक्षणगृह व बालगृहातील अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व जिल्ह्यातील बाल संगोपन योजना लाभार्थी मुले व मुली तसेच अन्य मुले व या मुलांमध्ये एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्या असल्याचे श्री.रसाळ यांनी सांगून महोत्सवामध्ये 350 मुली व मुले यांनी सहभाग घेतला आहे. यामधील 274 मुले- मुली विजेते व उपविजेते झाल्याचे म्हणाले.
निरीक्षणगृहातील इ. 7 वीचा विद्यार्थी मिहित मालवणकर व इ.5वी शिकणारी पुजा केदार यांनी मनोगत व्यक्त करताना, महोत्सवामध्ये तीन दिवस विविध खेळांचा आनंद मिळाला. खेळात विजयी झाल्यामुळे आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले.
अपेक्षा दंताळे हीने सादर केलेल्या कथ्थकली नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी. काटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार मानले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळे, संरक्षण अधिकारी मिलन कांबळे, परिविक्षा अधिकारी महेश सावंत उपस्थित होते. तिन दिवस चाललेल्या महोत्सवास न्य इंग्लिश स्कुलच्या मुख्यध्यापक अशोक रायबान, साईल अनंत क्रीडा शिक्षक एस.एस सावंत, संजीव राणे, अशोक गीते, उदय सावंत, रतन कसालकर, तेजस्वीनी पाटील, आर्या बागवे, अरविंद दळवी, डॉ. सुशील परब, डॉ. राजेश पालव, डॉ.ओमकार गोंडवनकर, अक्षय शेळके, सचिन खरवते आदींचे सहकार्य लाभले.
चाचा नेहरु बाल महोत्सवात काल झालेल्या क्रीडा स्पर्धास्पर्धेतील विजय खेळांडू पुढीलप्रमाणे :-
300 मिटर धावणे लहान गट (मुली) प्रथम क्रमांक चैत्राली न्हानु दळवी इ. 7 वी, व्दितीय क्रमांक राखी अनिल मालवे. 100 मिटर धावणे लहान गट (मुलगे) प्रथम क्रमांक पुष्कर चंपालाल गाडरी, व्दितीय क्रमांक आदित्य संतोष राठोड. 100 मिटर धावणे (मोठा गट) (मुलगे) प्रथम क्रमांक सर्वेश राजाराम कदम, व्दितीय क्रमांक चैतन्य संतोष परब.300 मिटर धावणे (मोठा गट) (मुली) प्रथम क्रमांक अपुर्वा रमाकांत पुजारे, व्दितीय क्रमांक यशश्री चंद्रकांत कुडाळकर. रिले लहान गट (मुली) प्रथम क्रमांक चैत्राली न्हानु दळवी, तनिष्का विजय सावंत, साक्षी परशुराम पाटील, प्रगती प्रविण म्हस्के. व्दितीय क्रमांक अंजली अजित राऊळ, अंजली विजय कलकुटकी, श्रावणी संजय गावडे, स्नेहल संजय पाटील. रिले लहान गट (मुले) प्रथम क्रमांक आदित्य संतोष राठोड, अर्णव भरत वारके, यश सुशांत गवस, कुणाल रवींद्र राठोड. व्दितीय क्रमांक सार्थक संतोष परब, स्वरित सतिश गायकवाड, यश हेमंत वस्त,नेहाल मंगेश कलकुटे. रिले मोठा गट (मुली) प्रथम क्रमांक अपूर्वा रमाकांत पुजारे, संजना शंकर पवार, सेजल संजय गवस, यशश्री चंद्रकात कुडाळकर, व्दितीय क्रमांक धनश्री तुकाराम परब, सानिया अजित राऊळ, सिंथिया टेनेलॉस फर्नांडिस, रिले मोठा गट (मुले) प्रथम क्रमांक ओंकार बाळकृष्ण घाडी, सर्वेश राजाराम कदम, प्रविण आजीनाथ सानप, वैभव राजन परब, व्दितीय क्रमांक सोहम संतोष नाईक, गोविंद सुरेश नाईक, चैतन्य संतोष परब, विठ्ठल कोंडू पांढरमिशे. खो-खो लहान गट (मुली) विजेता संघ सौरभ स्पोर्टस. उपविजेता संघ गणेश स्पोर्टस. खो-खो लहान गट (मुले) विजेता संघ रामजी स्पोर्टस. उपविजेता संघ अनिकेत स्पोर्टस. खो-खो मोठा गट (मुली) विजेता संघ मोगरा गट. उपविजेता संघ गुलाब गट. खो-खो मोठा गट (मुलगे) विजेता संघ तानाजी संघ. उपविजेता संघ शिवाजी महाराज. कबड्डी लहान गट (मुली) मुलगे विजेता संघ तानाजी संघ. उपविजेता संघ शिवाजी. कबड्डी लहान गट (मुली) विजेता संघ सौरभ संघ. उपविजेता दुर्गा संघ. कबड्डी मोठा गट (मुली) विजेता संघ B संघ. उपविजेता संघ A. कबड्डी मोठा गट (मुलगे) विजेता संघ शिवाजी महाराज संघ. उपविजेता अजिंक्यतारा संघ. कॅरम लहान गट (मुलगे) प्रथम क्रमांक मानस महेश परब, व्दितीय क्रमांक निशांत अमोल पाटील. कॅरम मोठा गट (मुली) प्रथम क्रमांक छायांकिता परशुराम परब,व्दितीय क्रमांक अपुर्वा रमाकांत पुजारे. कॅरम लहान गट (मोठा गट मुलगे) प्रथम क्रमांक मितेश साईनाथ यादव, व्दितीय क्रमांक जीवन श्यामा जाधव, बुध्दिबळ मोठा गट (मुली) विजेता अनुष्का अनिल मालवे. उपविजेता अपुर्वा रमाकांत पुजारे. बुध्दिबळ लहान गट (मुली) विजेता समृध्दी अशोक जाधव. उपविजेता साक्षी परशुराम पाटील. बुध्दिबळ मोठा गट (मुलगे) विजेता गिरीष अरुण सावळे. उपविजेता गोविंद सुरेश नाईक. बुध्दिबळ लहान गट (मुलगे) विजेता श्लोक गणेश हुक्कीरे. उपविजेता साक्षांत सुरेश मठकर. लांब उडी मोठा गट (मुलगे) विजेता सर्वेश राजाराम कदम. उपविजेता यश अशोक पवार. लांब उडी मोठा गट (मुली) विजेता सेजल संजय गवस. उपविजेता प्राची प्रकाश मालवे. लांब उडी लहान गट (मुलगे) विजेता कुणाल रवींद्र राठोड. उपविजेता बालाजी कृष्णा नाईक. लांब उडी लहान गट (मुली) विजेता चैत्राली न्हानु दळवी. उपविजेता स्नेहल संजय पाटील. वक्तृत्व स्पर्धा मोठा गट (मुली) विजेता प्रांजल छोटीराम चौरे,उपविजेता सृष्टी पिंगुळकर. वक्तृत्व स्पर्धा मोठा गट (मुले) विजेता वेदांत भगवान आचरेकर. वक्तृत्व स्पर्धा लहान गट (मुली) प्रथम क्रमांक, पुजा बापुराव केदार. व्दितीय क्रमांक राखी अनिल मालव. तृतिय क्रमांक मृणाली प्रशांत कासार. वक्तृत्व स्पर्धा लहान गट (मुलगे) प्रथम क्रमांक, स्वराज रणजित पाटील. व्दितीय क्रमांक रोहित मारोती देशटवाड. तृतिय क्रमांक निहित भार्गव मालवणकर. गोळा फेक लहान गट (मुली) प्रथम क्रमांक, अंजली अजित राऊळ, सानिका मदनलाल सोळंके व्दितीय क्रमांक सुरभी अनिल जाधव. गोळा फेक लहान गट (मुलगे) प्रथम क्रमांक, पुष्कर चंपालाल गाडरी, व्दितीय क्रमांक लक्ष्मी कोंडू पांढरमिशे. गोळा फेक मोठा गट (मुलगे) प्रथम क्रमांक, चैतन्य संतोष परब, व्दितीय क्रमांक ओंकार दिनेश ठाकुर. गोळा फेक मोठा गट (मुली) प्रथम क्रमांक, संजना शंकर पवार, व्दितीय क्रमांक तृप्ती गुरुदत्त दळवी.