You are currently viewing अध्यात्माच्या प्रांगणात..

अध्यात्माच्या प्रांगणात..

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*वक्रतुंड साहित्य समूहाचे संस्थापक लेखक कवी जगन्नाथ खराटे लिखित अप्रतिम लेख*

*अध्यात्माच्या प्रांगणात..*

*आनंदी जिवनाचं रहस्य (जमाखर्चाचं योग्य व्यवस्थापन)*

“कसं काय चाललंय वहिनी”? शेजारच्या राधाकाकुनं,आमच्या सौभाग्यवतीला मोठ्यानं,आवाज देत घरांत पाऊल टाकलं..अन् मग गप्पांचा कार्यक्रम रंगला. स्रीजातीला वाग्देवता प्रसन्न असल्यानं त्यांच्या गप्पांना अंत नसतो म्हणून त्या गप्पाशी काही घेणेदेणं नाही अशा प्रकारे कानाडोळा करीत मी लेखन करीत होतो.पन् राहुन राहुन शेवटी ते शब्द कानावर पडतं अन् त्यावर विचार करनं भाग होतं… सौ चे ते शब्द,. “अहो काकू, हल्ली आम्ही दोघेही कमावतो पन् पगार पुरतंच नाही.. किती महागाई वाढली हो??””


साहजिकच आहे,, अगदी तथ्य होतं त्यांत.पन् माझ्या मते जशी महागाई वाढते तसे पगारही वाढतात.. अगदी महागाईच्या बरोबरीनं नसले तरी थोडे उन्नीसबीस अशा प्रकारे ते वाढतात.. तरीही ते आपल्याला का पुरंत नाही? अगदी नवरा बायको मिळुन दोघांनीही काम केलं तरी पगार अपूरा का पडतो??
अन् मग, हृया प्रश्नांंचं उत्तर सोडण्याचा प्रयत्न केला अन् मग जरा मागच्या पिढीकडे डोकवलं.. जुन्या काळात घरांत पुरुषमंडळी शेतीवाडी करीत, नोकरी धंद्याला नव्हते , घरांत एकटाच कमवता असे.पन् तो आपल्या कुटुंबाचं अगदी व्यवस्थित पालनपोषण करीत असे.अगदी निरामय आनंदाने जीवन जगंत असे.तेव्हा,एक कुटुंब पद्धती होती, आजीआजोबा आईबाबा, काका, सर्वंच मंडळी अगदी गुण्यागोविंदाने नांदत असतं.. अगदी स्वर्गसुखाचा लाभ घेत होते त्या काळात..
मग हल्लीच्या काळांत आतां तर पतीपत्नी तर दोघेही काम करतात तरीही पगार पुरंत नाही..हे असं का?? अन् मग जरा कुटुंबा्च्या कमाई अन् खर्चाचं गणीताकडे निरखू लागलो् . जुन्या काळातील अन् सद्ध्याच्या
काळातल्या जमाखर्चाचा तालामेळ ह जुळवु लागलो. अन् चुटकीसरशी गणित सुटलं.. अगदी काखेत कळसा अन् गावाला वळसा,अशा पद्धतीने वागत असतो आपन सारेजन…अन त्यामुळे आपंनंच, आपलं जीवन जगनं अगदी कठीन करुन ठेवलं आहे. सगळीकडे निरंस अन् तानतनावयुक्त जिवनशैली झाली आज..अगदी अपवाद सोडले तर आपन सारयांच्या घरांत आर्थिक स्थिती बिघडली आहे. अन् त्याचं कारण म्हणजे कौटुंबिक जमाखर्चाच्या योग्य व्यवस्थापनाचा अभाव.खरं तरं अजुनही, रोजंदारीवर काम करणारे हातावरचे मजुर गरीब लोकही आनंदी जिवन जगताना दिसतात. इतरांसाठी मोठमोठ्या इमारती बांधकाम करणारे मंजुर मात्रं, रात्री मोकळ्या आकाशाखाली बिनघोरपने आनंदाची, सुखाची झोप घेत असतात.. पन् आपन सारे वनबिएचके फ्लॅटमध्ये गरगरत्या पंख्याखाली सुखाची झोप कधी येते ह्याची वाट पाहत जागे असतो.. अगदी वारेमाप पगार घेऊनसुद्धा… ह्यांचं कारण त्यांच्याकडे असते जमाखर्चाचं योग्य व्यवस्थापन अन् मनःशांतीसाठी हेंच एकमेव कारण पुरेसं ठरतं अन् नेमकं तेंच आपल्याकडे नसतं..
सहसा अनेक घरांत,आर्थिक परिस्थिती बिघडण्याची कारणे भरपूर आहेत, त्यापैकी काही कारणे देता येईल.‌. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल हवांच असतो.अगदी गरज असो वां नसो, तरी नवनवीन विकंत घेण्याची प्रवृत्ती, घरां घरांत, नवनवीन महागडं फर्निचर, टिव्ही, फ्रिज एअरकंडिशन, कॉम्प्युटर, शोभेच्या चैनीच्या वस्तू अन् आपल्या आहारविहाराच्या सवयी व्यक्तिगत खर्च,नवनवीन कपडे लत्ते, सौंदर्य प्रसाधनं.ब्युटी पार्लर, वाढदिवस सन उत्सव, पार्टी, लग्नसमारंभासाठी अवास्तव खर्च, ह्या सर्व दिखावु अन् इतरांच्या बरोबरीने जायची घातक सवयी अथवा स्पर्धेचे जिवन आज जगंत आहोत.पुर्विच्या काळात वाहनं ही अगदी तुरळकच होती,अन चालण्याचा व्यायाम हा तब्येतीसाठी अगदी उत्तम असे,अन खर्चबचतसुद्धा होई, पन् हल्ली प्रत्येक घरात एक तरी दुचाकी अथवा चारचाकी हवींच‌.जरी
काळ बदलला असला तरी काळानुसार चाललं पाहिजे हे अगदी खरं‌.. पन् त्याबरोबर आपल्या खिशाकडे पासुन, जमाखर्चाचा तालमेळसुद्धा घालनं जरुरीचं आहे.समोरच्याची मांडी बघुन आपल्याला ही तशीच पाहिजे ह्यासाठी आपन आपली झोपडी मोडुन,आवक नसताना कर्जबाजारी होवून मांडी बांधने हे केव्हाही क्लेशदायक ठरते. दिखाऊपना,अथवा इतरांची बरोबरी करुन,खर्चाचा भस्मासुर तयार करणे हे भगवान शिवासारखं आपल्यालाही त्रासदायक ठरू शकते.. अन् खर्चाचा हा भस्मासूर कधी आपल्या मानगुटीवर बसलेलं हे सांगता येणार नाही ‌. अन् सुखी जिवन जगनं दुष्कर होईल.. खरंतर, जमाखर्चाचं योग्य व्यवस्थापन हेंच सुखी अन् आनंदी जिवनाचं किंबहुना सुखी समाधानी जीवनाचं रहस्य आहे असं मला वाटतं…

©️जगन्नाथ खराटे , ठाणे
दि–३०नोव्हे२०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा