कणकवली :
कणकवली तालुक्यातील डामरे ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंचपदाचे अपक्ष उमेदवार दिनेश सुरेश मेजारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते माजी खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनेश मेजारी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा भगवा हाती घेतला. यावेळी कणकवली विधानसभा संघटक संदेश पटेल, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, कणकवली तालुका समन्वयक सुनील पारकर आदी उपस्थित होते.
दिनेश सुरेश मेजारी यांच्यासह सुरेश दत्तात्रय मेजारी, विजय राजाराम मेजारी, दशरथ विठोबा मेजारी, सुमित राजाराम मेजारी , लक्ष्मीकांत सुरेश मेजारी, शंकर रामचंद्र मेजारी, रुपेश दत्तात्रय मेजारी, प्रणय प्रभाकर मेजारी, सुधाकर दत्तात्रय मेजारी, दयेश सुधाकर मेजारी, दत्तप्रसाद प्रभाकर मेजारी यांनी पक्षप्रवेश केला. सरपंचपदाच्या उमेदवाराने ऐन निवडणूक प्रचारा आधीच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात केलेला पक्षप्रवेश ही राजकीय दृष्ट्या मोठी घटना मानली जात आहे.