कणकवली
आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, तांबे एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी प्रदीप शंकर सर्पे ( वय ५०) यांचे ९ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. किडणीच्या आजारामुळे ते गेले वर्षभर आजारी होते. शिक्षण महर्षी आर. एल. तांबे यांचे ते जावई होत. कसवण बौद्धिय प्रगती मंडळ मुंबई, मुलखी शाखेचे माजी सचिव तसेच मुंबई तालुका संघाचे क्रियाशील सदस्य, तसेच मतिमंद शाळा करंजे चे ते संस्थापक होते. प्रदीप सर्पे यांच्यावर आज सायंकाळी मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.