You are currently viewing शब्दरूपी

शब्दरूपी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास पवार आण्णा लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*शब्दरूपी*
(उद्विग्न मनातून उठलेले वादळ)

एक दिवस तुमच्यातून
असाच उडून जाईल
फक्त शब्द रुपी गंध मी
हवेत सोडून देईल

पुन्हा नविन प्रवास
आयुष्याचा सुरू होणार
तुम्हाला कायम माझी
आठवण येणार

जेव्हां जेव्हां तुम्हाला
आठवण माझी येईल
वाचले माझे शब्द तर
हृदयात जागा होईल

नाही काही शिल्लक आता
सरण पेटले आहे
आता खरचं जीवन मला
शून्य वाटले आहे

देहाने तुमच्या मी
सोबत जरी नसेल
पण शब्दरूपी होऊन
शब्दात अमर असेल

#शब्दांचा जादूगार
रामदास आण्णा
©® चे सर्व अधिकार आरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा