*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील, चांदवड लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आई*🌹
वाटतं आई देवा घरुन
तु परतुन यावं
सकाळी झोपेतुन
मज उठवावं
डोके ठेवुन मांडीवर
शांत झोपी जावं
हात तुझा डोक्यावरून
हळुचं फिरवुन घ्यावं
हातातला घास तुझ्या
हातुन भरवावा
हळुचं तुझ्या पदराला
हात मी पुसावा
तुझ्या गोड स्पर्शाची
होते रोज जाणीव
पण नाही गं, तु दिसत
हिचं एक उणीव
बाहेरून आल्यावर
तुचं समोर दिसावं
संसाराचं माझ्या गाऱ्हाणं
तुचं माझं ऐकावं
दुखता खुपता माझं
तुचं जवळ बसावं
हाक तुला मारते, ना गं,
एकदा तरी ऐकावं
नाही घरात मायेची ओल
आसू माझं कोणी पुसावं?
दुःख माझ्या मनीचं
आई,कोणाकडे सांगावं ?
*शीला पाटील. चांदवड.*