You are currently viewing इंद्रायणीच्या पाण्यात

इंद्रायणीच्या पाण्यात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*इंद्रायणीच्या पाण्यात*

इंद्रायणीच्या पाण्यात प्रतिबिंब पाहे कुणी
अहो दुजी नव्हे कोणी ती तो शुक्राची चांदणी….
इंद्रायणीच्या पाण्यात…..

आहे निर्मळ ते जळ जणू पावन ती गंगा
ज्ञानदेव वावरले रात्रंदिन तेथे सांगा
चारवेद जणू चारी भावंडे ती होती गुणी

इंद्रायणीच्या पाण्यात ……

इंद्रायणीच्या पाण्यात अहो तरती अभंग
मोठा पावन तो आहे म्हणे इंद्रायणी संग
तुकोबाने लिहिली हो इथे अभंग ती वाणी
इंद्रायणीच्या पाण्यात ……

इंद्रायणीच्या पाण्यात आहे विठाई माऊली
धरे आळंदी वर ती तिच्या कृपेची सावली
पाण्यावर तरंगते ज्ञानोबांची ती विराणी
इंद्रायणीच्या पाण्यात…….

ज्ञानदेव तुकाराम इथे गर्जती अभंग
तीर सारा होई गाणे नादमय ते तरंग
नाद विठ्ठल विठ्ठल गुणकारी आहे पाणी
इंद्रायणीच्या पाण्यात ….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ५/१२/२०२२
वेळ : संध्या. ४/३०

प्रतिक्रिया व्यक्त करा