महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड तर्फे नागनाथ कोतापल्ले यांना श्रध्दांजली अर्पण
बिजली नगर चिंचवड-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षा लेखिका विनीता ऐनापुरे यांनी त्यांच्या झालेल्या भेटीच्या आठवणी सांगितल्या.
बी आर माडगूळकर यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या.
ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा श्रध्दांजली वाहताना म्हणाले की, मराठी कविता-आकलन आणि आस्वाद, तसेच साहित्याचा अन्वयार्थ ही त्यांची पुस्तके मी वाचली होती. ते विद्यार्थी प्रिय होते. पुण्यात एक श्रोता म्हणून मी उपस्थित होतो. मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चे ते कुलगुरू होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री. राजन लाखे यांनी कोत्तापल्ले यांनी स्वाक्षरीने दिलेल्या काव्यसंग्रह ” मुडस ” मधील कवितेचे वाचन केले.
मा. माधुरी मंगरूळकर, योगिता कोठेकर, सुनंदा शिंगणात, विशाखा कुलकर्णी रेणुका हजारे, प्रातिभा कुलकर्णी, बी. आर. माडगूळकर माधुरी वैद्य डिसोजा (कुमठेकर), किशोर पाटील, दत्ता ठोकळे, आदि सदस्य उपस्थित होते.