You are currently viewing दत्तलीला

दत्तलीला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित दत्तजयंती विशेष अप्रतिम अभंग रचना*

*दत्तलीला*

दत्त नाम मुखी ! सदा माझ्या राहे !!
पायी तुझ्या वाहे ! भक्तीफुलें !!

ध्यानी मनी वसे ! दत्त नयनात !!
दत्त हे श्वासात ! सदाकाळ !!

ब्रम्हा विष्णू साथी ! महेश त्रिमूर्ती !!
त्रिभुवनी किर्ती ! दत्तलीला !!

सकल जनांचा ! दत्त हा आधार !!
करिती उद्धार! जडजीवा !!

गुरुविण नाही ! कुणी कल्पतरू !!
तारी दत्तगुरु ! संकटात !!

©[दिपी]✒️
दीपक पटेकर,सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा