You are currently viewing वंदनीय बाबासाहेब आंबेडकर

वंदनीय बाबासाहेब आंबेडकर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी श्री.माधव वि. सातपुते (विगसा ) लिखित अप्रतिम काव्यरचना*

*वंदनीय बाबासाहेब आंबेडकर*
🙏🙏🙏

वंदन वंदन त्या विभूतीला..
मानवतेच्या महामानवाला..।। धृ ।।

जो जाणतो अर्थ मानवतेचा..
मानव ! एकच धर्म मानवी..
सर्वाठायी एकची आत्मा..
वंदन वंदन त्या विभूतीला..।।..१

विवेकीनिधर्मी,चारित्र्यागृही..
स्पृश्यास्पृश्यतेचा, विरोधक..
जगती , मानवतेचाच पुजारी..
वंदन , वंदन त्या विभूतीला..।।..२

प्रज्ञावंती , नितीज्ञ तो सहिष्णू..
मानवी संस्कृतीचा अध्यापक..
बुद्ध ! आगळाच परिवर्तनाचा..
वंदन , वंदन त्या विभूतीला..।।..३

भारतीय संविधानाचा उद्गाता..
जगतवंद्य ! हा श्रेष्ठमहामानव..
अमर , देशभक्त भारतभूमीचा..
वंदन , वंदन त्या विभूतीला..।।..४

भीमराव ! सर्वांचाच कैवारी..
ज्ञान , विज्ञानाचा असे पाईक..
आदर्श पुत्र , हा भारतभूमीचा..
वंदन , वंदन , त्या विभूतीला..।।..५
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*रचना:-©️वि.ग.सातपुते.(भावकवी)*

प्रतिक्रिया व्यक्त करा