बांदा :
रोणापाल गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दि. ६ रोजी साजरा होणार आहे. सकाळी धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर ओटी भरणे, केळी-नारळ ठेवणे, नवस-बोलणे आदी होणार आहे.रात्रौ पालखी मिरवणूक झाल्यानंतर आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे तरी भाविकांनी व नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.