*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*!! गीता बोध !!*
कृष्ण लाभला गुरुवर
शिष्य कौंतेय धनुर्धर ||१||
बोधी माधव अर्जुनासी
गीता लाभली जगतासी ||२||
गीता शिकवी ब्रह्मज्ञान
गीता जागवी आत्मभान ||३||
ज्ञान देतसे तत्त्वज्ञाचे
भान येतसे जगण्याचे ||४||
कैसे बोलावे विवेकाने
कैसे रहावे संक्षेपाने ||५||
कैसी असावी आत्मियता
कैसी असावी अलिप्तता ||६||
करू अभ्यास जीवेभावे
राहू सदैव प्रेमभावे ||७||
कर्म करावे इच्छेवीना
जावे शरण दयाघना ||८||
धर्म असतो जिथेजिथे
लाभे विजय तिथेतिथे ||९||
सखा श्रीकृष्ण दयावान
देई कृपेचे वरदान ||१०||
ज्योत्स्ना तानवडे.
वारजे, पुणे.५८