*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गीता जयंतीच्या निमीत्ताने..गीतांश*
कर्म करावे चांगले
नको फळाची अपेक्षा
स्थिर बुद्धी असावी
कर्तव्यपूर्तीची घ्यावी दीक्षा..
जे केले ते समर्पित
करावे भगवंताला
तोच आहे समर्थ
भार आपुला वहायला…
मी कोण आहे
मी ब्रह्म आहे
ओळख स्वत:ची
तेच सत्य आहे…
कशाला हवी देहपूजा
शरीर एक आवरण
आत्मा अमर आहे
शस्त्राग्नी न करी भक्षण…
सत्व रज तम गुण
काम क्रोध मद लोभ
भेदाभेद अहंकार
नको स्वार्थ माया क्षोभ..
सुख दु:खात जो स्थिर
न कधी बुद्धी विपरीत
आपल्या हाती नसे काही
जाणावे भगवंताचे इप्सीत…
*राधिका भांडारकर पुणे*