*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अरे माणसा*
अरे माणसा माणसा
जप रे माणुसकीला
निसर्गाची करं सेवा
तीस ढासळून चालला
निसर्गाचं आहे देणं
दाट गर्द वनराई
वनौषधी मिळे आपणा
हिचं रे आपली आई
अरे माणसा माणसा
माणुस तुझे नावं
जप वनराई आज
नको घालुस रे घाव
पाखरांची किलबिल
सांगे आपणास धडा
तृष्णा तयांची भागवं
ठेव दारी जलघडा
नदी मायेच्या पात्रात
बांधलेस तुचि घरं
कसा नाही रे येणार ?
तुझ्या घरामंदी पुर
कौलारींवरती ठेव
पाखरांसी दाणापाणी
तहानले जीव सारे
येतील रे दीनवाणी
*शीला पाटील. चांदवड.*