*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मृणाल प्रभुणे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शिल्प*
चांदण्या रात्रीत भासे
मज शिल्प एक तू ..
कमनीय बांधा रेखीव
घडीव, कातीव मोहक
मोहवून करतो मजसी घायाळ
सांगू कसे तुज शब्दात.. ||१||
साक्षीस हा रजनीनाथ
सजीव शिल्प हे समीप
मधुर स्मित पाहुन खळीत
कसे सावरू गं माझे भावविश्व?|२
शिल्पातच तू आहेस
कि तुझ्यातच आहे शिल्प?
अद्वैताचा जाणवे अर्थ
आज मजला यथार्थ.. ||३||
भासातच आहे आभास
कि मृगजळापरी हा भास?
कि सत्याचा हा स्वप्नभास?
पडलोय मी गं संभ्रमात.. ||४||
शरद चांदण्याच्या नितळाईत
शिल्पासम हे पाहून रूप
मी झालोय गं पुरता बेभान
घालू कसा मनास लगाम ? ||५||
नको छळूस मजला आता
नच साहवे हा गं दुरावा!!
दे मज मिठीत आसरा
आतुर मी तव मिलना..
आतुर मी तव मिलना.. ||६||
🍂
मृणाल प्रभुणे
नाशिक.