*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी श्रीकांत वडकुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दोन बायका…!!*
दोन बायका फजिती ऐका
मन तशी ऐकायला छान
ज्याला आहेत दोन बायका
त्याच्या डोक्याला नेहमी ताण
दोन बायका करून बिचारा
नवरोबा फसला आता
एकीचे लाड करता करता
जीवावर उठली आवदसा आता
एकीला सोबत चाल म्हंटल
ती गालातल्या गालात हसते
दुसरी लगेंच म्हणती तिकडून
तुम्हाला काय माझी लाज वाटते
भाऊ म्हणतो तुम्हाला
एकच बायको लय भारी
दुसरी आवडली म्हणून
आणू नका तिला घरी
श्रीकांत वडकुते
रा. बाभुळगाव
जिल्हा. हिंगोली