पाळणेकोंड धरणावरील योजनेसाठी मंजूर असलेला ४५ कोटीचा निधी तात्काळ वर्ग करण्याची मागणी
सावंतवाडी
शहराच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पाळणेकोंड धरणावरील सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर असलेला ४५ कोटीचा निधी तात्काळ वर्ग करण्याची मागणी आपण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे, अशी माहिती सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.
तर जुनी पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे ३४ टक्के पाणी वाया जात आहे. त्यामुळे शहराला पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी ही योजना तात्काळ मार्गी लागल्यास नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होऊ शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर या संदर्भात श्री. चव्हाण यांनी सकारात्मकता दर्शवल्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व संदीप नाईक उपस्थित होते.