You are currently viewing कर्मफल

कर्मफल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे ज्येष्ठ लेखक कवी वि. ग. सातपुते (विगसा) लिखित अप्रतिम काव्यरचना*

*कर्मफल*
**********

अस्वस्थ जीवा छळते घुसमट
मन मुक्त मोकळे करत रहावे

प्रहर व्याकुळलेला एकांताचा
अंतर्मुख होवुनी सत्य जाणावे

गतजन्माचे ऋणानुबंध जीवनी
जीवाजीवाला जपत रहावे

भावशब्दांचे लाघव प्रीतस्पर्शी
मुक्तहस्त्ये सदा उधळीत रहावे

अगम्य सारिपाट तो जीवनाचा
निःसंकोची खेळतची रहावे

आपुल्या हाती काहीच नसते
भाग्य भाळीचे झेलित रहावे

सुखदुःख आनंद खंत वेदना
कर्मफल म्हणुनी भोगत रहावे
***********************
*रचना क्र. ३१५/ ३०/११/२०२२*
*©️वि.ग.सातपुते.( भावकवी )*
*📞 ( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा