मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत
सावंतवाडी :
कोकण दौऱ्यावर असलेल्या श्री. ठाकरे यांचे आज सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास येथील गवळी तिठा परिसरात आगमन झाले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी बोलण्यासारखं खुप आहे, मात्र आताच बोलत नाही उद्या बोलतो, असे पत्रकाराच्या प्रश्नाला हसून टोलवत मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौरा सुरू केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आणि युवा नेते अमित ठाकरे उपस्थित होते. दरम्यान याप्रसंगी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता आत्ताच काही बोलत नाही उद्या बोलतो असे सांगून त्यांनी आधी बोलणे टाळले त्यानंतर ते कुडाळच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.
यावेळी माजी आमदार तथा सरचिटणीस परशुराम उपरकर, मनसेचे नेते नितीन सरदेसाई, जिल्हाध्यक्ष धीरज परब, शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, प्रवीण मर्गज, ॲड. राजू कासकर, ॲड. अनिल केसरकर, शुभम सावंत, प्रवीण गवस, कौस्तुभ नाईक, मनोज कांबळी, संदेश शेट्ये, मंदार सुभेदार, सुरेंद्र कोठावळे, दिनेश मुळीक, बाळा बहिरे, अभय देसाई, ज्ञानेश्वर सावंत, नाना सावंत, आबा चिपकर, राजेश मामलेकर, संतोष भैरवकर, मंदार नाईक, नंदू परब आदींसह मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.