You are currently viewing श्रीगोंदवलेकरमहाराज -काव्यचरितावली काव्यपुष्प- वंदना श्रीचरणा ।।

श्रीगोंदवलेकरमहाराज -काव्यचरितावली काव्यपुष्प- वंदना श्रीचरणा ।।

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण देशपांडे लिखित अप्रतीम काव्यरचना*

*श्रीगोंदवलेकरमहाराज -काव्यचरितावली काव्यपुष्प- वंदना श्रीचरणा ।।*
————————————————–
श्रीगणेशदेवा, विद्यादेवी सरस्वती
वंदन करितो, करीतो विनवणी
काव्यलेखनास लाभो सदा गती
असावी कृपा ही प्रार्थना चरणी ।।

रेणुकामाता,आईभवानीस नमन
कोल्हापूरच्या अंबाबाईचे स्मरण
तिरुपतीबालाजीचे स्पर्शीतो चरण
चरीतलेखनास द्यावे काव्य स्फुरण ।।

भक्तवत्सल श्रीसद्गुरू माऊली
मज लाभली त्यांची कृपासावली
हात जोडुनी करी तुम्हा विनवणी
प्रासादिक रसाळ व्हावी लेखणी ।।

दीपप्रतिभेचा श्रीगुरूंनीच लाविता
कवीअरुणदास लेखना सिद्ध झाला ।।
—— —————————————–
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
——————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा