You are currently viewing ।।जय मल्हार।।

।।जय मल्हार।।

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

*।।जय मल्हार।।*

सदानंदाचा येळकोट करू पुकार
एळकोट एळकोट जय मल्हार।। ध्रु।।

ऋषी आज्ञे मणी मल्ला चा करुनी वध
लिंगद्वय रूपे चमत्कार दावीत
मार्गशीर्ष चंपाषष्ठीस देव अवतार।।1।।

खंडोबाची पाच प्रतीके सर्वज्ञात
लिंग तांदळा मुखवटे मूर्ती टांक
धातूंच्या प्रतिमा उभ्या-बैठ्या अश्वस्वार।।2।।

भैरव अवतार मल्हारी मार्तंड
बानू,म्हाळसां पती शोभे म्हाळसाकांत
खंडामंडित खंडोबा शिव अवतार।।3।।

खंडोबाच्या चतुर्भुजा बहु शोभत
खड्ग त्रिशूळ डमरू रुधिरमुंड
पानपात्र नंदी अश्व श्वान सेवा तत्पर।।4।।

अनेक पत्री खंडोबास वाहती भक्त
पुरण रोडगा हळदी खोबरे नैवेद्य
नवसां पावे देव किर्ती अपरंपार ।।5।।

जागरण भजन गोंधळ तळी भरतात
वारी खंडोबाची वाघ्या मुरळी देती प्रसाद
दिवटी ओवाळती वाहती बेलभंडार।।6।।

खंडोबा महाराष्ट्राचे आहे कुलदैवत
कर्नाटकात खंडोबाचे असंख्य भक्त
वंदूया खंडोबास देईल शुभ वर।।7।।

श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा