सदस्य पदासाठी २२ तर सरपंच पदासाठी १० जणांचे नामनिर्देशन
कणकवली
ग्रामपंचायत निवडणुकी ची रणधुमाळी सुरू झाली असून कणकवली तालुक्यात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी २ तर दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी २० जणांचे सर थेट सरपंच पदासाठी १० जणांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली. २ डिसेंबर पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असून, सकाळी ११ ते दुपारी ३ असा वेळ देण्यात आला आहे. दुपारपासूनच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती.