You are currently viewing प्रतिष्ठेच्या बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत साईप्रसाद काणेकर रिंगणात

प्रतिष्ठेच्या बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत साईप्रसाद काणेकर रिंगणात

सावंतवाडी :

 

बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग ५ मधून शिवसेना शहरप्रमुख तथा माजी ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

मागील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी शिवसेना आणि राणे समर्थक स्वाभिमान पक्षाची मोट बांधण्यात साईप्रसाद काणेकर यांचा मोलाचा सहभाग होता. त्या निवडणुकीत साईप्रसाद काणेकर किंगमेकर ठरले होते असे म्हटल्यास वावगे ठरणार आहे.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनेलने घवघवीत यश संपादन केले होते. मात्र नारायण राणे भाजपमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा बांदा ग्रामपंचायतीवर भाजपचेच वर्चस्व राहिले होते. दरम्यान मागच्या आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात साईप्रसाद काणेकर यांनी आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत.

आमदार, खासदार यांच्यामार्फत शहरातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीही साईप्रसाद काणेकर यांनी आणला आहे. प्रभाग ५ मध्ये साईप्रसाद काणेकर यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. याठिकाणी स्वतःची त्यांनी व्होट बँक निर्माण केली असल्याने त्यांच्याविरोधात भाजपला तुल्यबळ उमेदवार द्यावा लागेल.

साईप्रसाद काणेकर यांनी या निवडणुकीतही भाजप विरोधी सर्वांना एकत्र घेत गाव विकास पॅनलची पुन्हा एकदा मोट बांधली असून या ग्रामविकास पॅनेलमधून अनेक नवे चेहरे निवडणूक रिंगणात दिसणार आहेत. या निवडणुकीविषयी साईप्रसाद काणेकर यांच्याशी संपर्क साधला असता बांदा शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. प्रभाग ५ मधून मी निवडणूक लढवणार असून याही निवडणुकीत ग्रामविकास पॅनेलला मोठे यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा