You are currently viewing अध्यात्मिक उन्नतीसाठी साधना, सत्संग करा

अध्यात्मिक उन्नतीसाठी साधना, सत्संग करा

हळदीपुर वैश्यगुरू मठाधिश श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचे प्रतिपादन

बांदा

घरोघरी सायंकाळी दररोज सद् ग्रंथ वाचन, उपासना ,भजन झाले पाहिजे.गावागावात उपासना वर्ग सुरु झाले पाहिजेत. समाजात एकी वाढली पाहिजे.समाज प्रगतीची गती साठलेल्या डबक्यासारखी नको तर वाहत्या पाण्यासारखी प्रवाही असली पाहीजे.मोक्षप्राप्ती हेच मानवी जिवनाचे अंतिम ध्येय्य अाहे.त्याकरीता अध्यात्मिक उन्नतीसाठी साधना व सत्संग केला पाहिजे ,असे प्रतिपादन हळदीपूर वैश्यगुरु मठाधीश श्री श्री वामनाश्रम स्वामी यांनी बांदा येथे केले. केरळहून गोवामार्गे महाराष्ट्रात आगमन झालेल्या

वैश्य कुलगुरू श्री संस्थान शांताश्रम मठाधिपती परमपूज्य श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या शांकर एकात्मता पदयात्रेचे बांदा वैश्यवाणी बांधवांच्या वतीने शुक्रवारी बांदा शहरात भव्य स्वागत करण्यात आले.

या सोहळ्यात आशिर्वचन देताना ते बोलत होते.

शुक्रवारी सायंकाळी उशीरा गोव्यातून पदयात्रेचे बांद्यात आगमन झाले. बांदा दत्त मंदिर लकरकोट, पत्रादेवी येथुन महास्वामीजीच्या पदयात्रे बांद्यातील शेकडो अनुयायी सहभागी झाले.

गुरुमहाराज गुरुमहाराज जय जय गुरुमहाराज या जयघोषात ही पदयात्रा बांदा शहरात बांदेश्वर मंदिर नाका, गांधीचौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक हॉस्पिटल कट्टा, हायवे सर्कल, गवळीटेम्ब येथून पदयात्रा मार्गक्रमण करत भास्कर शांताराम पावसकर यांच्या निवासस्थानी आली.

या ठिकाणी उभारलेल्या मंडपातील पीठासनावर श्री श्री वामनाश्रम स्वामी विराजमान झाले. त्यानंतर स्तोत्र पठण आदी होऊन महास्वामींचे भक्तांना आशिर्वाचन प्रारंभ झाले. त्यानंतर सर्वांनी महास्वामींचे दर्शऩ घेतले व त्याच्याकडून आशिर्वादाच्या फलमंत्राक्षता प्राप्त केल्या. यावेळी स्थानिक भजनकर्मींनी श्री गुरुचरणी आपली भजनसेवा सादर केली. त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम झाला. शुक्रवारी रात्री पदयात्रेचा मुक्काम बांदा येथे पावसकर यांच्या निवासस्थानी झाला.

शनिवारी श्री चंद्र मौळीश्वर देवतांची स्वामीजीच्या हस्ते पूजा झाली. दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर बांदा येथून पदयात्रेचे सावंतवाडीकडे प्रयाण झाले. ही पदयात्रा कातडी (केरळ) ते कशी अशी होत आहे.

बांदा नगर वैश्य वाणी समाजाच्या वतीने बांदा येथिल सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा