बांदा :
भारतीय संविधानाला ७३ वर्षे पुर्ण झाली असून भारतीय संविधानाने स्वातंत्र, बंधुता, न्याय, समता, लोकशाही हे अधिकार मिळवून दिले असून या भारतीय संविधानाचा सन्मान दिवस जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ केंद्रशाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी केले. यावेळी २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांनी संविधान उद्दिशिकेचे सामुहिक वाचन केले व संविधानाप्रमाणे आचरण करण्याची शपथ घेतली.
या वेळी धीरज सतिश पटेल या विद्यार्थ्यांने बाबासाहेबांची वेशभूषा साकारली होती. तर सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर या विद्यार्थ्यांने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. यावेळी उपशिक्षिका सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, जागृती धुरी, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस, रंगनाथ परब, प्रशांत पवार, गोपाळ साबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षक जे.डी.पाटील यांनी केले.