डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संविधान दिनानिमित्त समता पर्वाचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी
आज 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन समता पर्वाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री. चिकणे यांनी दिली. .
सामाजिक न्याय भवन यांच्यावतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनापासून ते 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिनापर्यंत समता पर्व म्हणून पाळण्यात येत आहे. या समता पर्वाच्या निमित्ताने विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे, या निमित्ताने संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर शासकीय वसतीगृहे, आश्रामशाळा, महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थ्यांनी यांनी सामुहिक प्रभात फेरी काढून संविधानाची जनजागृती केली. या कार्यक्रमानिमित्त सहाय्यक आयुक्त श्री. चिकणे व जिल्ह्यातील समतादूत संग्राम कासले यांनी संविधानाबाबत आपले विचार व्यक्त केले.