*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*प्रेमाच्या बागेत*
त्याचे अल्लड हुल्लड वागणे
तिला खूप आवडायचे
त्याचा लडिवाळा ती
चोरून लपून बघायचे
तोही तिच्याकडे
एक तिरकस कटाक्ष
टाकायचा
तिला लाजलेलं पाहून
हलकेच स्माईल द्यायचा
तिचे मागे वळून बघण्याचे
कारण मात्र कळायचे
तिचं गोडं मधाळ हसणे
त्याला रोज छळायचे
पण….
त्याच्या आठवणीत तारूण्य तिचे
असेच सरून गेले
गुलाबी स्वप्नांच्या धुक्यात
म्हातारपण तिचे घेरुन आले
कळलेच नाही तो
असा कसा पारखा झाला की
त्याला दुरून बघण्याचे क्षण
असे कसे हरवून गेले
तरिही त्याच्या प्रतिक्षेत
प्रेमाच्या बागेत
ईथेतिथे ती त्याला शोधत असते
बागेतली हिरवळ पांघरूण
त्याचा अल्लड हुल्लड
लडिवाळ
पुन्हा पुन्हा आठवत बसते
कदाचित तिचं त्याच्यावर
प्रेमच असेल
पण तिला सांगता आले नाही
त्याला सांगायला तिला
दोन पावले पुढे
चालता आले नाही
तो पुन्हां येईलं
त्याच्या मनातले सांगेलं
म्हणून आजही ती
तो बसायचा
त्याच बाकावर बसुन
त्याची वाट पहात असते
त्याच्या येण्याच्या
पायवाटेवरून
नजर तिची हटतं नसते.
*संजय धनगव्हाळ*