You are currently viewing बांदा येथील बांदेश्वर-भूमिका देवस्थानाचा वार्षिक दीपोत्सव उत्साहात

बांदा येथील बांदेश्वर-भूमिका देवस्थानाचा वार्षिक दीपोत्सव उत्साहात

बांदा :

 

बांदा येथील श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक दिपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दरवर्षी देवदीपावलीला हा कार्यक्रम केला जातो. शेकडो भाविकांनी पेटविलेल्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचा परिसर लख्ख उजळून गेला होता.

सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्गचे सेवानिवृत्त अभियंता सुधीर देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभाष मोर्ये, उपाध्यक्ष बाळू सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, धोंडू पणशीकर, उमेश मोर्ये, गजानन मोर्ये, राजा सावंत, दादा सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, प्रवीण सावंत, संतोष तारी, सुगंधा मोर्ये, अरुणा मोर्ये, उमांगी मयेकर, अवंती पंडित आदींसह देवस्थानचे पदाधिकारी सदस्य मान्यवर उपस्थित होते. तसेच असंख्य भाविकांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

या दिपोत्सवासाठी प्रत्येक दिव्यांसाठी अकरा रुपये अर्पण मूल्य ठेवण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने दीपप्रज्वलित केले. श्री बांदेश्वर भक्त महिला सेवेकरी मंडळींनी दिवे भरून देण्याचे काम केले. तसेच मंदिरासमोर सुंदर रांगोळ्या ही रेखाटल्या होत्या. श्री बांदेश्वर भूमिका मंदिराचा परिसर यावेळी दिव्यांच्या तेजाने उजाळून गेला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा