You are currently viewing मोरयाचा धोंडा पवित्र पाषाणाचा आज वर्धापन दिन – विजय केनवडेकर 

मोरयाचा धोंडा पवित्र पाषाणाचा आज वर्धापन दिन – विजय केनवडेकर 

शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन…

मालवण

दांडी येथील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा या पवित्र पाषाणाचा वर्धापन दिन आज २५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजता साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमास शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे सचिव विजय केनवडेकर यांनी केले आहे.
हिंदुस्थानच्या आरमाराचे जनक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी २५ नोव्हेंबर १६६४ रोजी दांडी भागातील समुद्र किनाऱ्यावरील मोरयाचा धोंडा याठिकाणी किल्ले सिंधुदुर्गचे भूमिपूजन केले. त्यामुळे दरवर्षी किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या वतीने या पवित्र पाषाणाचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या पाषाणाला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी समितीच्या वतीने गेली काही वर्षे सातत्याने प्रयत्न केले गेले. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणूनच आज मोरयाचा धोंडा आणि परिसराचा शासनाच्या नावे स्वतंत्र सातबारा तयार झाला आहे. समस्त महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या महाराजांनी वसवलेल्या या प्रवित्र स्मृतीस मानाचा मुजरा करण्यासाठी दांडी समुद्रकिनारी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री. केनवडेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा