You are currently viewing 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमाचे आयोजन

26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमाचे आयोजन

26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी,

सामाजिक न्याय भवन येथे शनिवार दि. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत “सामाजिक न्याय पर्व” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे शनिवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करुन, संविधान वाचनाने कार्यक्रमास सुरवात केली जाणार आहे. तसेच विभागात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची यशोगाथा पुस्तक, उत्कृष्ट कार्याचा लघू माहितीपट यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे. जिल्ह्यातील समतादूतमार्फत सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत पथनाटय सादर करुन प्रचार प्रसार केला जाणार आहे.  

            शिवाय या कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता संवाद उपक्रम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जिल्हा जात पडताळणी समिती यांच्याकडून जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व लघुनाटय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालये, शासकीय वसतिगृह तसेच आश्रमशाळेमधील प्राचार्य, गृहपाल व मुख्याध्यापक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून स्पर्धां आयोजित कराव्यात. जिल्ह्यातील जास्ती-जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा