You are currently viewing जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत शालेय निबंध व वक्तृत्च स्पर्धा संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत शालेय निबंध व वक्तृत्च स्पर्धा संपन्न

सिंधुदुर्गनगरी

 सकल भारतीय अभियान-2022 अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाच्यावतीने निबंध व वक्तृत्च स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 7 वी गटामधून 40 विद्यार्थी, तर इयत्ता 8 वी ते 10 वी गटामधून 33 विद्यार्थी असे एकूण 73 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

निबंध स्पर्धेत 5 वी ते 7 वी गट : प्रथम क्रमांक- तन्वी प्रकाश दळवी, द्वितीय क्रमांक- श्रेया प्रविण मगर,  तृतीय क्रमांक – सुधांशु महेश धुरी, उत्तेजणार्थ चौथा क्रमांक- राजलक्ष्मी संग्राम पाटील, उत्तेजणार्थ पाचवा क्रमांक- दिव्या बापुजी आंगणे.

वक्तृत्व स्पर्धेत 5 वी ते 7 वी गट : विभव विरेश राऊळ व कर्तुत्वा विनायक हरकुळकर या दोघांनी प्रथम क्रमांक पटकावला, योगिनी सुदेश वारंग, हिमानी चेतन प्रभू, मैथिली अनंत धोगळे या तिघीही द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.  तृतीय क्रमांकामध्ये अनुष्का वामन काणेकर, उत्तेजणार्थ चौथा क्रमांक- पूर्वा प्रसाद गावडे, उत्तेजणार्थ पाचवा क्रमांक- रोहित मारोती देशटवाड.

            निबंध स्पर्धेत 8 वी ते 10 वी गट : प्रथम क्रमांक- जान्हवी श्रृषिकेश गावडे, द्वितीय क्रमांक- पूनम गंगाराम नाईक, तृतीय क्रमांक- सुमिधा सुभाष गावकर, उत्तेजणार्थ चौथा क्रमांक- तनया वासुदेव धुरी, उत्तेजणार्थ पाचवा क्रमांक- शिवांगी संजय अणसूरकर.

वक्तृत्व स्पर्धेत 8 वी ते 10 वी गट : प्रथम क्रमांक- श्रावणी राजन आरावंदेकर, द्वितीय क्रमांक- कुशाली नामदेव गुरव, तृतीय क्रमांक- चंदना महादेव पावसकर, उत्तेजणार्थ चौथा क्रमांक- युक्ता प्रसाद सापळे, उत्तेजणार्थ पाचवा क्रमांक- सलोनी प्रकाश सावंत.

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश डी.बी. म्हालटकर, कुडाळ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. ढोरे व वेंगुर्ले दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश डी. वाय. रायरीकर यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

 या स्पर्धेचे परिक्षण नितीन साबाजी बांबार्डेकर, ध्वजेंद्र विठोबा मिराशी, अरुण आत्माराम मर्गज, डी. बी. म्हालटकर, पी.आर. ढोरे, डी. वाय. रायरीकर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक व्ही.डी. कदम यांनी केले.  या कार्यक्रमास जि.प. माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाकारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व अधिकारी/कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा