You are currently viewing गझल

गझल

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार प्रकाश क्षीरसागर लिखित अप्रतिम गझल रचना*

*गझल*

आयुष्य आसवांचे असते दोन क्षणांचे
ओझे कसे कुणाला वाटे तरी मणांचे

सोडून देत जावा तू राग द्वेष सारा
दावील रोज तुजला भीषणत्व त्या रणांचे

लग्नास योग्य झाला आतूर वधू बघाया
कारण आड येते अवघड अशा पणाचे

देशास काय आहे मग फायदा जनांचा
नसतो तयार धन तो देण्यास आंदणांचे

धरणीस पोषण्याला नाही कुणीच वाली
व्हावे रिते कधी हे आकाश चांदण्याचे

#. सागर प्रकाश
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
९०११०८२२९९

प्रतिक्रिया व्यक्त करा