सिंधुदुर्गनगरी :
कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पीटल येथे डेडीकेटेड कोवीड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या खाजगी रुग्णालयामध्ये कोवीड – 19 च्या रुग्णांवर सशुल्क उपयार करण्यात येतील. उपचारांसाठी राज्य शासनाने ठरवून दिलेले दर आकारण्यात येणार आहेत. याठिकाणी कोविड -19 च्या रुग्णांसाठी 8 खाटा आरक्षित असणार आहेत. या रुग्णालयामध्ये डॉ. अनंत नागवेकर, डॉ. कीर्ति नागवेकर, डॉ. संजय मराठे, डॉ. मयूर नागवेकर हे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.