वैश्य बांधव करणार जंगी स्वागत
बांदा
वैश्य कुलगुरू श्री संस्थान शांताश्रम मठाधिपती परमपूज्य श्री श्री वामनाश्रम स्वामी यांची शांकर एकात्मता पदयात्रा शुक्रवार दिनांक २५ रोजी बांदा शहरात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बांदा वैश्य बांधवांच्या वतीने पदयात्रेचे भव्य स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता गोव्यातून पदयात्रा बांद्यात येणार आहे. बांदा दत्त मंदिर लकरकोट, पत्रादेवी येथे महास्वामीजीचे आगमन होणार आहे. त्यानंतर शहरात बांदेश्वर मंदिर नाका, गांधीचौक, हॉस्पिटल कट्टा, हायवे सर्कल, गवळीटेम्ब येथून पदयात्रा मार्गक्रमण करणार आहे. भास्कर शांताराम पावसकर यांच्या निवासस्थानी पदयात्रेचा मुक्काम होणार आहे. सायंकाळी ६ वाजता स्तोत्र पठण व महास्वामींचे भक्तांना आशिर्वाचन होणार आहे. रात्री ८ वाजता महाप्रसाद होणार आहे.
शनिवार दिनांक २६ रोजी दुपारी १२ वाजता श्री चंद्र मौळीश्वर देवतांची स्वामीजीच्या हस्ते पूजा होणार आहे. दुपारी १ ते २ या वेळेत महाप्रसाद झाल्यानंतर ३ वाजता बांदा येथून पदयात्रेचे सावंतवाडीकडे प्रयाण होणार आहे. ही पदयात्रा कातडी (केरळ) ते कशी अशी होणार आहे.
वैश्य समाज बांधवानी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन बांदा नगर वैश्य वाणी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.