You are currently viewing कणकवलीत रेल्वे फटकातील धक्कादायक घटना

कणकवलीत रेल्वे फटकातील धक्कादायक घटना

रेल्वे आली फाटकात तरी फाटक गेटमन गाढ झोपेत

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

कणकवली*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात काही वर्षांपूर्वी एक अपघाताची घटना घडलेल्या कटिंग जवळील एका गावातील रेल्वे फटकात मालवाहक रेल्वे त्या फटका पर्यंत येऊन पोहोचली तरी गेटमन झोपी गेलेला असल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र सुदैवाने मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टाळली. मात्र या घटने मुळे आता कोकण रेल्वे मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने हालचाली सुरू झाल्या असून, वरिष्ठ कार्यालयाकडून अधिकाऱ्यांच्या पथकांच्या फेऱ्या कणकवलीत सुरू होण्याची शक्यता आहे.


दरम्यान याबाबत उपलब्ध माहितीनुसार कणकवली तालुक्यात रेल्वे ट्रॅक जवळ कटिंग जवळ असलेल्या एका गावातील रेल्वे फाटकात ड्युटीला असलेला गेटमन झोपी गेल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून जात असलेली मालवाहक रेल्वे फाटकाच्या जवळ येण्यापूर्वीच या मोटरमन ला लांबूनच लाल रंगाचा लावला जाणारा फ्लॅशर दिसला. त्यामुळे रेल्वे फाटक बंद नसल्याची मोटरमनची खात्री झाल्याने त्या मोटरमनने प्रसंग सावधान राखत फटका पासून काही अंतरावरच मालवाहक रेल्वे थांबवली. आणि तिथून रेल्वे फाटतात येत झोपी गेलेल्या संबंधित गेटमनला जागे केले असे समजते. मात्र या घटनेने त्या गेटमन ला भर थंडीत घाम फुटल्याचे समजते. तसेच या घटनेनंतर फाटक बंद करून त्यानंतर मालवाहक रेल्वे ही पुढील दिशेने मार्गस्थ केली. मात्र त्याच दरम्यान मोटर मनने या घटनेची थेट बेलापूर कंट्रोलला माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, या अनुषंगाने लवकरच संबंधित रेल्वे सुरक्षा पथक कणकवली दाखल होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडून पूर्णपणे गोपनीयता बाळगण्यात येत असून, कोणतीही माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यास नकार देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा