You are currently viewing ज्ञानेश्वर माऊली…

ज्ञानेश्वर माऊली…

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखित संत श्री. ज्ञानेश्वर माउलींची अप्रतीम काव्यरचना*

*ज्ञानेश्वर माऊली…*
….

*माझी माऊली ज्ञानाई*
*निवृत्ती सोपान मुक्ताई*
*सोबती इंद्रायणी माई*
*भली आळंदीची पुण्याई*

*माझी ज्ञानेश्वर माऊली*
*असे कैवल्याचा पुतळा*
*मोगरा फुलला फुलला*
*वैष्णवांना केवढा लळा*

*माऊली माझी ज्ञानाई*
*पसायदानी कळवळा*
*अवघ्या विश्वाचे कल्याण*
*भक्तिभाव अंतरी आगळा*

*यात्रा कार्तिकी आळंदीला*
*टाळचिपळ्या घुमतो निनाद*
*दिंड्या पताकांचा सोहळा*
*मुखी माऊलीमाऊली साद*

*माझ्या माऊलीच्या राऊळी*
*सिद्धेश्वराचे पुरातन स्थान*
*त्याला सुवर्णपिंपळ शान*
*अलंकापुरीचे केवढे महिमान*

*देण्या समाधी माऊलीला*
*नाथ पंढरीचा तो आला*
*उठविला सिद्धेश्वराचा नंदी*
*ज्ञाना समाधिस्थ झाला*

*ऐसा देखियेला सोहळा*
*गहिवर इंद्रायणीला आला*
*स्वर्गातूनी होय पुष्पवृष्टी*
*कार्तिक वद्य त्रयोदशीला*…

*शब्दांकन*..✍️.
*सौ पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे*.
*9011659747*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा