*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्द…….*
शब्दांना घुमारे फुटतात अंकुर येतात
पालवी फुटते हे सारे खरे आहे
शब्द आहेत आपल्या जीवनात …
अहो, हे किती बरे आहे …..
शब्दांचाच तर खेळ आहे सारा
आनंदाने जगतो आपण
शब्दांमुळेच गळून पडते माझे
मी पण आणि तुझे तू पण…
शब्द लिहून गेलेत पूर्व सुरी
त्याच पावलांना आपण अनुसरतो
बोलताच आले नसते तर
आपण अस्तित्वच हरतो…
शब्दांची किमया आहे महान
माणूस त्या तुलनेत फारच लहान
पण शब्दांनीच नेले सागरपार
कधी शब्दांनीच होते खाली मान…
शब्द अमृत शब्द विष असतात
शब्दांनी माणसे पोळतात खाक होतात
तर कधी वाल्मिकी ज्ञानेश्वर बनून
अजरामर अक्षर होतात ….
शब्द मोगरा होऊन गगनी जातात
लता होऊन मनामनात विराजतात
चिरंजिव अक्षय लेणे म्हणजे शब्द
शब्द मोती होऊन शिवारा शिवारात ….
डोलतात ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १९/११/२०२२
वेळ : दुपारी १/३०