राहूल गांधी यांची *भारत जोडो यात्रा* कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत 3570 कि.मी. चा पायी प्रवास करत आहे. या यात्रेने 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश केला असून ही पदयात्रा 14 दिवसांचा प्रवास करून मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे.
या पदयात्रेत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर, सुगंधा साटम, महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी, युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर, सरचिटणीस चंद्रशेखर जोशी, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर,कुडाळ नगराध्यक्षा आफ्रिन करोल, आनंद परूळेकर, सुरज घाडी, व्ही.के. सावंत, अॅड. मनोज रावराणे,सुनिल पाटिल यांच्यासह अनेक कार्यकर्ते या भारत जोडो यात्रेत सामील झाले आहेत. कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर हे महाराष्ट्रातील संपूर्ण 384 की.मी.ची पदयात्रा राहूल गांधी यांच्या सोबत चालत आहेत.
राहुल गांधी सोबत चालताना कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर