इचलकरंजी / प्रतिनिधी :
इचलकरंजी येथील देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्या मंदिरमध्ये लायन्स क्लबच्या वतीने हेल्दी स्कूल उपक्रमांतर्गत मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, या आरोग्य तपासणी शिबीरात प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. शोएब मोमीन यांनी मुलांची आरोग्य तपासणी करत औषधोपचार केले. तसेच हिवाळ्यात मुलांच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.
प्रारंभी लायन्स क्लबचे प्रांतपाल विजय राठी , लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर, सेक्रेटरी सुभाष तोष्णीवाल , खजिनदार संदिप सुतार , कमिटी चेअरमन नंदकुमार बांगड, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेस प्रिंटर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते सर्व मुलांना खाऊ तसेच खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. सुजाता चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन सौ. कोमल आरेकर यांनी केले.यावेळी शिक्षिका सौ. तेजस्विनी काजवे ,रावळ मॅडम यांच्यासह शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व पालक उपस्थित होते.