कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत यश
ओरोस
दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून २०२२-२३ वर्षाकरिता दापोली विजय क्रीडा संकुल येथे आंतर महाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा १६ व १७ नोव्हेंबर रोजी पार पडल्या. या स्पर्धेत वर्धा येथील रहिवाशी व सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी तनया शिवाजी वळंजू हिने महिलांच्या उंच उडी स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविले आहे. याबाबत तनया हीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून पुरुष व महिला यांच्यासाठी आंतर महाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ६०० मीटर, १५०० मीटर धावणे, ४ बाय १००, ४ बाय ४०० रीले, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक अशा विविध मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. यातील महिलांच्या गटात तनया वळंजू हिने उंच उडी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तीन सर्वाधिक उंच उडी मारत पहिला क्रमांक पटकाविला. त्यामुळे ती महिलांच्या उंच उडी स्पर्धेत गोल्ड मेडलची मानकरी ठरली. तिला दापोली कृषी विद्यापीठाचे क्रीडा व सहशैक्षणिक विभागाच्या संचालक यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देवून तिला गौरविण्यात आले.